[kolhapur] - समृद्ध लोकांचे दिलदार शहर

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूरचे आणि माझं अगदी लहानपणापासूनच नातं. हे शहर अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. शूटिंग व अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूरशी कायमच नाळ जुळली आहे. विलोभनीय रंकाळा तलावापासून खासबागच्या खाऊगल्लीपर्यंत, शालिनी सिनेटोनापासून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहापर्यंत प्रत्येक ठिकाणच्या सुंदर आठवणी या मनाच्या कुप्पीत कायम साठविल्या आहेत. समृद्ध लोकांचे हे दिलदार शहर आहे, येथील प्रत्येक अनुभव माझ्यासाठी सुंदर आहे,'अशा शब्दांत अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी कोल्हापूरशी जुळलेल्या नात्याचे बंध आणखी घट्ट केले.

'शांताई मोशन पिक्चर्स'निर्मित 'बंदिशाळा'हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे डॅशिंग जेलरच्या भूमिकेत आहे. सिनेमाचे पटकथा लेखक संजय कृष्णाजी पाटील, दिग्दर्शक मिलिंद लेले यांच्यासह त्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयात आल्या असता त्यांनी कोल्हापूरशी निगडीत आठवणींना उजाळा दिला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/h0sBLAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬