[mumbai] - काजवा महोत्सवाला वेळेची मर्यादा

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासात पर्यटकांचा अतिवावर घातक ठरतो. त्याचेच प्रत्यंतर राज्यातील विविध भागांत आयोजित करण्यात आलेल्या काजवा महोत्सवात येते. त्यासंदर्भात वन्यजीवप्रेमींकडून आक्षेप नोंदवला जाताच, भंडारदऱ्यातील काजवा महोत्सवात पर्यटकांच्या प्रवेशवेळांवर निर्बंध घालण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांकडून काजव्यांच्या जीवनक्रमात होणारा हस्तक्षेप संपुष्टात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने २१ मेच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत वनविभागाने पर्यटकांच्या प्रवेशवेळांवर मर्यादा आणली आहे.

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये काजवा महोत्सवाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाऊ लागले आहे. या काजवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यामुळे काजव्यांच्या जीवनक्रमावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याची भीती वन्यजीवप्रेमींकडून सातत्याने व्यक्त केली जाते. काजवा महोत्सवात रात्रीच्या वेळेस कृत्रिम प्रकाश, कॅमेऱ्यांचे फ्लॅश, संगीताची साथ दिल्याने ही परिस्थिती आणखीनच हाताबाहेर जाण्याचा आक्षेप असून, याबाबत तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे. तीच गत भंडारदऱ्यातील काजवा महोत्सवासंदर्भात घडली. त्याबाबत 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर वनविभागाने पर्यटकांच्या वेळांबाबत नियंत्रण आणले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/za7euQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬