[mumbai] - डॉन रवी पुजारी सेनेगलमधून झाला फरार?

  |   Mumbainews

नवी दिल्ली

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी आफ्रिकेतील सेनेगस कोर्टाने जामीन मंजूर करताच फरार झाल्याचे वृत्त आहे. याच वर्षी २१ जानेवारीला सेनेगल येथे भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे रवी पुजारीला अटक झाली होती. पुजारी सेनेगलबाहेर गेला असेल तर त्याला शोधणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे.

आफ्रिकेतील सेनेगलमध्ये राहत असलेल्या रवी पुजारीवर भारतीय गुप्तचर यंत्रणा सतत लक्ष ठेवून होत्या. त्याला भारतात परत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. सेनेगलला येण्यापूर्वी पुजारी बर्किना फासो येथे राहत होता. रवी पुजारीविरोधात भारतात सुमारे २०० गुन्ह्यांची नोंद आहे.

कर्नाटक पोलिसातील सूत्रांनुसार, पुजारी सेनेगलमधून इतर देशात पळून गेला आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. पुजारीला इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. रवी पुजारीने आपले नाव बदलून ते अँथनी फर्नांडीस असे ठेवले आहे. त्याने बुर्किना फासो देशाचे नागरिकत्व घेतल्याचा दावा केल्याचेही सूत्रांनी सांगितले....

फोटो - http://v.duta.us/D5_KowAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/OKcjBgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬