[mumbai] - धावत्या कारच्या दरवाज्यावर बसून 'चिंतन'; पोलिसांनी केली अटक

  |   Mumbainews

मुंबई

धावत्या कारच्या दरवाजात बसून कारच्या टपाला गप्पा मारत आयुष्याचे चिंतन करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. एका ट्विटद्वारे मुंबई पोलिसांचे या प्रकाराकडे लक्ष वेधण्यात आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर या कारवाईची अनोख्या शैलीत माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी एका ट्विटर युजरने मुंबई पोलिसांना टॅग करत व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत कारमधील दोघेजण दरवाजात बसून कारच्या टपाचे टेबल करुन गप्पा मारत होते. यातील एका व्यक्तीच्या हातात बाटलीही दिसत होती. त्यामुळे अशा बेजबाबदार आणि अपघाताला आमंत्रण देणारे असल्याचे ट्विटमध्ये म्हटले होते. वांद्रे येथील कार्टर रोडवरील दृष्य असल्याचेही नमूद करण्यात आले होते. या व्हिडिओनंतर खार पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत तिघांना अटक केली. या तिघांवर आयपीसी २७९, ३३६ आणि १८४ अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो - http://v.duta.us/zMTXVgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ZW36uQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬