[mumbai] - 'बेटी बचाओ'चे नारे फोल ठरले आहेत: उद्धव

  |   Mumbainews

मुंबई

अलिगडमध्ये अडीच वर्षांच्या मुलीचा बलात्कारानंतर खून झाल्याच्या घटनेवरून केंद्रातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने केंद्र सरकारला घरचा अहेर दिला आहे. 'अलिगडच्या घटनेने समाज सुन्न झाला आहे. ही एक प्रकारची बधिरता ठरते. कारण अशा अनेक कोवळ्या कळ्यांवर अत्याचार सुरूच असतात. ‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात, असे म्हणताताना, 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयाचा आनंदोत्सव संपला असेल तर अलिगडमध्ये घडलेल्या भयंकर प्रकाराकडे पाहायला हवे', असा सल्लावजा टोला लगावला आहे.

'सत्ताधाऱ्यांनी मर्यादा पाळायला हव्यात'

शिवनेचेच्या 'सामना' या मुखपत्रात अग्रलेखाद्वारे उद्धव यांनी हे भाष्य केले आहे. प्रियंका गांधी, राहुल गांधी, अखिलेश यादव यांनीही त्या मुलीच्या बाबतीत संवेदना व्यक्त केल्या आहेत. पण जे सत्ताधारी म्हणून निवडून आले आहेत त्या लोकप्रतिनिधींनी मर्यादा पाळणे गरजेचे आहे. मोदी व शहा अशा लोकांना वारंवार समज देत असतात तरीही ही मंडळी भरकटलेली का असतात?, असा उद्विग्न सवालही उद्धव ठाकरेंना विचारला आहे....

फोटो - http://v.duta.us/C76YRAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wJIthgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬