[mumbai] - मुंबईत तीन वर्षांतील सर्वात तप्त रविवार

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसत असल्या तरी, मुंबईत मात्र लांबलेल्या उन्हाळाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. रविवारचा दिवस हा जूनमधील गेल्या दहा वर्षांतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला, तर तीन वर्षांमधील जूनमधील सर्वाधिक तापमान रविवारी नोंदले गेले. सांताक्रूझ येथे रविवारी ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.

गेले दोन-तीन दिवस प्रचंड उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. रात्रीही यातून दिलासा मिळत नाही. रविवारी सकाळी सांताक्रूझ येथे २८.८ तर कुलाबा येथे २९ अंश किमान तापमान नोंदवले गेले. हे तापमान जूनमधील सरासरी तापमानापेक्षा अनुक्रमे १.४ आणि १.७ अंशांनी जास्त होते. तर कमाल तापमानामध्येही रविवारी आणखी वाढ नोंदली गेली. कमाल तापामान सांताक्रूझ येथे ३६.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले, तर कुलाबा येथे ते ३४.८ अंश सेल्सिअस होते. सांताक्रूझ येथील तापमान जूनचा दुसरा आठवडा संपला तरी अजूनही चढेच आहे. या आधी सन २०१४मध्ये जूनमधील सर्वाधिक कमाल तापमान ३८ तर सन २०१५मध्ये ३६.८ अंश सेल्सिअस होते. जूनमध्ये सर्वसाधारण कमाल तामपान ३२.४ अंश असते. मात्र रविवारचे तापमान हे सरासरी तापमानापेक्षा ४ अंशांनी अधिक होते. त्यातच सांताक्रूझ येथे आर्द्रता ६६ टक्के तर कुलाबा येथे ८२ टक्के होती. त्यामुळे वाढलेले तापमान आणि आर्द्रता यामुळे पावसाऐवजी घामाच्याच धारा वाहात होत्या....

फोटो - http://v.duta.us/cdHYxQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KTexjQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬