[mumbai] - म्हाडा मुख्यालयाचा होणार कायापालट

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयाचा संपूर्णपणे कायापालट करण्याचा प्राधिकरणाचा मानस असून, तीन महिन्यांत या कामास सुरुवात होणार आहे. सुमारे ४० वर्षे आयुर्मान असलेल्या मुख्यालयाच्या पुनर्विकासाची योजना प्रत्यक्षात येणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी योजनेचा मुहूर्त साधला जाणार आहे. नवीन मुख्यालयाची इमारत १६ मजली असून, त्यात म्हाडासह काही महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांनाही सामावून घेण्याची योजना आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्यालय वांद्रे पूर्व येथे आहे. पाच मजली इमारतीची अवस्था जीर्ण झाल्याने तिथे दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या इमारतीच्या पुनर्विकासातून टोलेजंग इमारत बांधण्याकडे म्हाडाचा कल आहे. सध्याच्या इमारतीस बऱ्याच ठिकाणी तडे गेले असून अनेक ठिकाणचे प्लास्टरही निखळले आहे. त्याविषयीच्या तक्रारींनंतर काही महिन्यांपूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या ऑडिटनंतर इमारतीची दुरुस्ती हाती घेण्यात आली. मात्र, दुरुस्तीवर भर देण्यापेक्षा म्हाडाचे नवीन मुख्यालय उभारण्याचा विचार प्रत्यक्षात येत आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/1M9t6QAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬