[nagpur] - चाळीशीतच जडतोय हृदयरोग

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

निदान, उपचार तंत्र अद्ययावत झाले आहे. त्यामुळे सरासरी वयोमान वाढले आहे. दुसरीकडे संसर्गजन्य आजारांनी दगावणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. मात्र त्याची जागा जीवनशैलीशी निगडीत आजारांनी घेतली आहे. रक्तदाब, स्थुलपणा आणि मधुमेहाचे बोट धरून येणाऱ्या हृदयरोगाने यात आणखी भर घातली आहे, अशी चिंता शनिवारी येथे व्यक्त करण्यात आली.

हृदयरोगावर जागृती करीत तज्ज्ञांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी कार्डिऑलॉजी सोसायटीच्यावतीन शनिवारपासून दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात उच्च रक्तदाब, मधुमेहाचे बोट धरून येणारा हृदविकार, हृदयविकारामागची कारणे, रक्तवाहिन्यांचे आकुंचनपावणे, फुप्पुसाच्या वाहिन्यांमधील अडसर, अद्ययावत उपचार तंत्र आणि भविष्यातील वैद्यकीय चिकित्सा या सारख्या विषयांवर मंथन केले जात आहे.

शास्त्रीय बाजूने यावर प्रकाश टाकताना भोपाळ येथील हृदयरोगचिकित्सक डॉ. पंकज मनोरिया म्हणाले, हृदयरोग दूर ठेवण्यासाठी अॅस्प्रीन नावाची गोळी खुप लोकप्रिय आहे. त्यामुळे जराही छातीत दुखू लागले, की अस्प्रीन घेतली जाते. मुळात हा समजच चुकीचा आहे. रक्तप्रवाह करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळे आल्यानंतर हृदयरोग होतो. मात्र ही गोळी रक्तातला घट्टपणा कमी करून रक्त पातळ करते. त्यामुळे अवयवांमध्ये, मेंदूत अतिरिक्त रक्तस्त्राव होण्याची जोखीम बळावते. या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे घातक ठरते. हा धागा पकडत ज्येष्ठ हृदयरोग चिकित्सक डॉ. अजिज खान म्हणाले, बाह्यरुग्ण विभागात हृदयाशी निगडीत तक्रारी घेऊन येणाऱ्या दर दहा व्यक्तीपैकी चार जण वयाच्या चाळीशीतील असतात. अवतीभवतीच्या दर हजार व्यक्तींपैकी दर दहावा माणूस कुठल्या ना कुठल्या कारणाने हृदयरोगाच्या उंबरठ्यावर असतो. माणसाचे सरासरी वयोमान वाढले असले, तरी आजारांचे वय कमी कमी होत आहे. पूर्वी साठीनंतर येणारा हा आजार आता चाळीशीतच गाठत आहे. अशा वेळी आजारांचे व्यवस्थापन करणे आणि जीवशैली सुधारणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

फोटो - http://v.duta.us/UZpkJQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/SaFNUQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬