[nagpur] - संविधान आमच्या गावात पोहोचलेच नाही

  |   Nagpurnews

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके झाली. तरीही, संविधानाने दिलेल्या मुलभूत गरजांची पूर्तता झालेली नाही. आजही गावात जात पंचायतचा कायदा सुरू आहे. सामा​जिक बहिष्कार होते आहे. एवढेच काय, रस्ते नाहीत. शाळा आहेत पण शिक्षण नाही. इंग्रज गेली. परंतु, गावागावातील वंचित घटक अद्यापही गुलाम आहेत. मांगगारूडी आजही पोलिसांचा लेखी चोर आहेत. एक पशू पकडला की दहा वर्षे शिक्षा भोगणारे पारधी आजही गावात आहेत. त्यामुळे 'आमच्या वस्तीपर्यंत अद्यापही संविधान पोहोचलेच नाही.' अशी व्यथा वंचित समाजातील या घटकांनी व्यक्त केली. यावरून आजही गावखेड्यातील वेशीबाहेर असलेल्या समाजाची काय अवस्था आहे, याचे चित्र डोळ्यासमोर आले.

दीक्षाभूमीवर आयोजित दोन दिवसीय भारतीय संविधान साहित्य संमेलनातील एका परिसंवादात दुर्बल घटकांशी संवाद कार्यक्रमात घेण्यात आला. शाळा आहे, पण ​​शिक्षक नाही. गाव आहे, पण रस्ता नाही. जेवायला दोन वेळचे मिळत नाही. शिवाय, अंधश्रध्दा, परंपरा, जुन्या चाली व रूढी यात पिचलेला समाज आजही अशिक्षित आहे. या समाजात मोठी क्रांती करू पाहणाऱ्यांना आजही व्यथा, वेदनांचे ओझे वाहावे लागते. एवढेच नव्हे तर समाजाच्या विरोधालाही सामोरे जावे लागत आहे. त्यांचे दु:ख त्यांच्याच शब्दात....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/iRs5EAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬