[nagpur] - ४० मिनिटांचा एक हुक्क्यामध्ये १०० सिगारेट इतका घातक

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

बनाना, ऍपलपासून तर स्ट्रॉबेरीच्या फ्लेवरमध्ये असलेला 'हुक्का' ओढणे हल्ली फॅशनच नाही तर स्टेटस बनले आहे. बिडी-सिगारेटपेक्षाही घातक असताना तरुणाईचा हुक्का पार्ट्यांना विळख्यात अडकत आहे. केवळ ४० मिनिट 'हुक्का' ओढल्याने शरीरात १०० सिगारेट ओढल्यावर निर्माण होणाऱ्या निकोटिनएवढा टार जमा होतो, अशी माहिती चेस्ट रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी (पुणे) यांनी दिली.

चांदा पासून बांद्यापर्यंत सर्वत्र श्वसनाशी निगडीत आजार, क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसिज अर्थात सिपीओडीचा विळखा वाढत आहे. त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्या पुढाकारातून आणि पुणे येथील चेस्ट रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने राज्यात सरकारी मेडिकल कॉलेजशी संलग्न रुग्णालयांमध्ये सीपीओडी ट्रिटमेंट मॉड्यूल राबविले जात आहे. यात विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदिया मेडिकल कॉलेजचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे रविवारी मेडिकलच्या ओटी एफमधील सभागृहात औपचारिक उद्घाटन करण्यात आले....

फोटो - http://v.duta.us/jjMlYQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uNJ1ZgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬