[nashik] - आघाडीचे गळाले अवसान पराभवाच्या चिंतनासाठी लागेना मुहूर्त लागेना मुहूर्त

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना चिंतनासाठी मुहूर्त मिळू शकलेला नाही. त्यामुळे हे चिंतन केव्हा होणार आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष कसा सज्ज होणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ, तर निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले धनराज महाले यांचा समावेश आहे. काँग्रेसचा उमेदवार दोन्ही मतदारसंघात नसला तरी राष्ट्रवादीसोबत आघाडी असल्याने आघाडीचा उमेदवार रिंगणात होता. मोदी लाटेने आघाडीला जबर फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील पराभवाचे चिंतन केले जाईल, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले गेले. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन आठवडे झाले तरी पदाधिकाऱ्यांना चिंतनासाठी वेळ मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसे निराशेचे वातावरण आहे. पदाधिकारी चिंतन केव्हा करणार आणि झाल्या चुका कधी समजणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही महिन्यांतच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची तयारी करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठीही काही हालचाली सध्या नाहीत. सध्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराशेने ग्रासले आहे. पदाधिकाऱ्यांनी चिंतन करून योग्य तो धडा घेणे आणि पुढील निवडणुकीसाठी तयार होणे आवश्यक आहे. तेव्हाच कार्यकर्त्यांनाही दिलासा मिळणार आहे. मात्र, दोन्ही गोटात कमालीची शांतता असल्याने आम्ही याचा काय अर्थ घ्यावा, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/LFCc4wAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬