[nashik] - कारखान्यांचा अंतिम निर्णय लवकरच

  |   Nashiknews

कारखान्यांचा अंतिम निर्णय लवकरच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बँकेने जप्त केलेला नाशिक सहकारी साखर कारखाना व निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. यासंदर्भात रविवारी जिल्हा बँक संचालकांची बैठक झाली. यावेळी अर्जछाननीत पात्र ठरलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दोन्ही कारखान्यांकडे २७८ कोटींची असलेली थकबाकी 'एनपी'मध्ये गेल्याने बँकेने या कारखान्यांची मालमत्ता अगोदरच जप्त केली. त्यानंतर या मालमत्तेचा तीन वेळेस लिलावही काढला. पण, त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे जिल्हा बँकेने हे दोन्ही कारखाने भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या. त्यात निफाड साखर कारखान्यासाठी टायचे इन्फ्रा लिमिटेड (मुंबई), कृषी कल्याणी अॅग्रो (अहमदनगर), साईकृपा शुगर अँड इंडस्ट्रीज (पुणे), कै. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था (पिंपळगाव बसवंत), समर्थ शुगर अॅग्रो या कंपन्यांनी निविदा भरल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक साखर कारखान्याकरिता टायचे इन्फ्रा लिमिटेड (मुंबई), एसएसबीएन इंड इंडिया (जुन्नर), अतुल शुगर टेक या कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. या निविदांची गुरुवारी छाननी करण्यात आली. पात्र निविदाधारक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी भाडेतत्त्वाच्या अंतिम प्रक्रियेबाबत रविवार जिल्हा बँकेत बैठक झाली. विविध बाबींवर कंपनीच्या प्रतिनिधींनी माहिती दिली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hp4KcAEA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬