[nashik] - तंत्रज्ञानाचा वापर योग्य कामासाठी व्हावा

  |   Nashiknews

मानसी यांचे देशमुख यांचे प्रतिपादन

...

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शूरवीर महाराणा प्रताप यांच्या ४७९ व्या जयंती निमित्ताने आयटीआय सिग्नलवरील नाईस सभागृहात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आठव्या जयंती व्याख्यानमालेत 'पालकत्व घडविणारे व बिघडविणारे' याविषयावर मानसी देशमुख यांनी उपस्थितांसमोर विचार मांडले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य कामासाठी करा, असे आवाहन देशमुख यांनी केले.

बदलत्या तत्रंज्ञानाच्या काळात कुटुंबातील व्यक्तींचे संवाद मोबाइल, इंटरनेट व टीव्हीमुळे बंद होत चालले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. परंतु तरुणांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर होत असल्याने तो त्यांच्यासाठी घातक असल्याचे देशमुख म्हणाल्या.

एकिकडे एकत्र कुटुंब पद्धत बंद होत चालली असताना सोशल मिडियाच्या अतिवापरामुळे तरुणांसह ज्येष्ठांमध्येही नैराश्य येत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनावर होत असल्याने केवळ योग्य कामासाठीच सोशल मीडिया अथवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले....

फोटो - http://v.duta.us/s6cqvAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/mXBdEgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬