[navi-mumbai] - तुर्भे रेल्वे क्रॉसिंगवरील पादचारी पुलाचे उद्घाटनतुर्भे रेल्वे क्रॉसिंगवरील पादचारी पूलाचे उद्घाटन

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

ठाणे-बेलापूर रस्त्यावर तुर्भे नाका येथून रेल्वे क्रॉसिंग पलीकडे ये-जा करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडणाऱ्या जनता मार्केटपर्यंतच्या पादचारी पुलाचे उद्घाटन नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते रविवारी झाले. नवी मुंबई महापालिकेने रेल्वेच्या तांत्रिक सहकार्याने हा पादचारी पूल बांधला आहे.

उद्घाटनप्रसंगी ठाण्याचे खासदार राजन विचारे, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी पादचारी पुलाची पाहणी केली. ठाणे-बेलापूर रस्त्यावर तुर्भे नाका येथे असलेला पादचारी पूल नागरिकांच्या सोयीसाठी पुढे रेल्वे रूळ पार करून जनता मार्केटपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. या पादचारी पुलाच्या उभारणीसाठी सहा कोटी ८४ लाख ६९ हजार इतक्या खर्चास महापालिका सर्वसाधारण सभेची मंजुरी प्राप्त झाली होती. त्यास अनुसरून तांत्रिकदृष्ट्या पुलाचे काम योग्य होण्याच्या दृष्टीने पुलाची बांधकाम रक्कम डिपॉझिट टर्म तत्त्वावर मध्य रेल्वेकडे महापालिकेच्या वतीने देण्यात आली होती. ११५ मीटर लांब आणि पाच मीटर रुंद असलेल्या या तुर्भे रेल्वे क्रॉसिंगवरील पादचारी पुलामुळे दररोज जीव मुठीत धरून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GqLuSAAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬