[pune] - दारू पिण्यास दिला नकार, जवानाला मारहाण

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

औंध मिलिटरी कॅम्पमध्ये एका जवानाने दारू पिण्यास नकार दिल्याने त्याच्या चार सहकारी जवानांनी त्याला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी (३ जून) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास औंध मिलिटरी स्टेशन येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी फिर्याद देण्यात आली आहे.

रमेश मोहनराव विष्णोई (२६) असे जखमी जवानाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मेजर सोहम सिंग बिश्ट, लेफ्टनंट महिपालसिंग खाती, सुभेदार सुभाष चंद, नाईक सुभेदार विकास मंडल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी रमेश यांना औंध मिलिटरी स्टेशन मधील एफटीएन बॅरॅक रूम नंबर १२ मध्ये बोलावले. त्यांना दारू पिण्याचा आग्रह केला. त्यासाठी रमेश यांनी नकार दिला. त्यामुळे चार जणांनी मिळून रमेश यांच्या तोंडात जबरदस्तीने दारू ओतली. मेजर बिश्ट यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि इतर सर्वांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी रमेश यांच्या तोंडात कापडाचा बोळा तोंडात घालून लाकडाने व लोखंडी रॉडने मारहाण करून रमेश यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

फोटो - http://v.duta.us/lasEogAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2jS6EAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬