[pune] - शवागारातील वीज १६ तास खंडित

  |   Punenews

'वायसीएम'मधील प्रकार; मृतदेह कुजण्याची भिती

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती हॉस्पिटलमधील (वायसीएम) शवविच्छेदन केंद्रातील कोल्डस्टोरेजचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शवागार १६ तास बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. वीजपुरवठा नसल्याने कोल्डस्टोरेजमधील मृतदेह कुजण्याची भीती निर्माण झाली आहे.

शुक्रवारी (७ जून) संध्याकाळी पिंपरी शहरात अचानक जोरदार वादळ आले. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय परिसतील एक झाड कोसळले. त्यामुळे शवविच्छेदन केंद्राचा वीजपुरवठा रात्री १२ वाजता खंडित झाला. या घटनेनंतर १६ तासांनी म्हणजेच शनिवारी (८ जून) दु. ४ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला. १६ तास वीजपुरवठा नसल्याने कोल्डस्टोअरेजमधील चार मृतदेह कुजण्याची भीती निर्माण झाली.

दुसरीकडे या कालावधीत नवे मृतदेह घेणे बंद करण्यात आले होते; त्याचप्रमाणे कोल्डस्टोरेजमधील मृतदेह घेऊन जावेत, अशी सूचना मृतांच्या नातेवाइकांना हॉस्पिटल प्रशासनाने दिल्या होत्या....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ICRC9gAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬