[pune] - शहरात नक्षलवादफोफावतोय : बर्गे

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यापीठात, महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सध्या शहरात सुरू आहे. आपल्या आजूबाजूला या घटना घडत आहेत. अशा वेळी आपण सतर्क राहून आपल्या परिसरात काय सुरू आहे, यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले.

मृत्युंजय अमावस्या विचार मंच, शिववंदना मित्र परिवार यांच्यातर्फे धायरी येथील डीएसके विश्व येथे छत्रपती संभाजी महाराज स्मृतिव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 'नक्षलवाद विरोधी लढा व सामान्यांचा सहभाग' या विषयावर बर्गे यांनी मार्गदर्शन केले. सचिन भोसले, संतोष देवकर, नीलेश भिसे, प्राज भिलारे आदी या वेळी उपस्थित होते.

'१९६३ मध्ये सुरू झालेली नक्षलवादाची चळवळ आता शहारांमध्ये पसरत आहे. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ब्रेन वॉशिंग सुरू आहे. पुणे विद्यापीठात नक्षलवाद पसरवायचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. चांगल्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये यासाठी मीटिंग घेतल्या जातात. पुण्यात औद्योगीकरण व झोपडपट्टी वाढत असल्याने तेथील रहिवाशांमध्ये गैरसमज निर्माण केले जात आहेत. नक्षलवाद्यांचा संविधान, लोकशाहीवर विश्वास नाही; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ते लोकांना फसवत आहेत, असे बर्गे यांनी सांगितले. आपला देश छत्रपती शिवाजी व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर भक्कम उभा आहे. फक्त अपण जागरुक राहिले पाहिजे. यातून आपले राष्ट्र आनंदी होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/w9r6wwAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬