[satara] - साताऱ्याला पावसाने झोडपले

  |   Sataranews

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा शहर आणि परिसरात शनिवार-रविवार सलग दोन दमदार पाऊस झाला. पूर्ण उन्हाळाभर वळीवाच्या पावसाने हुलकावणी दिली होती. अखेर शनिवारी पहाटे आणि रविवारची उकाड्याने नकोशी झालेली दुपार अचानक आलेल्या टपोऱ्या थेंबांनी अल्हाददायक झाली.

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सारा आसमंत काळ्या ढगांनी व्यापून गेला होता. दुपारी साडेतीन नंतर टपोऱ्या थेंबांनी जमीन चिंब झाली. वेगाने वाहणार वारे आणि अधून-मधून होणाऱ्या विजेच्या कडकडाटामुळे परिसरातील वीज बंद झाली. त्या नंतर काही क्षणातच उकाड्याने हैराण केलेल्या सातारकरांना पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी चिंब भिजवून टाकले.

येवतेश्‍वरचा बंड्या डोगर, वेगाने वाहणारे वारे, विजांचा कडकडाट, आकाशात दिसणारी काळ्या ढगांची दाटी आणि टपोऱ्या थेंबांचा मारा, असा सुंदर मिलाफ सातारकरांनी अनुभवला. मागील तीन महिन्यांत पाऊसच न झाल्याने सातारकर हैराण झाले होते. मात्र शनिवारी पहाटे आणि रविवारी दुपारी झालेल्या पावसाने तापमानाचा पारा खाली आला आहे. पावसाच्या माऱ्याने काही क्षणातच शहरातील प्रमुख रस्ते ओस पडले. रस्त्यावरून पाणीच पाणी वाहू लागले होते. शहरातील राधिका रोड, देवी चौक, राजवाडा, पालिका परिसरात पाण्याची तळीच निर्माण झाली होती. या पावसाने उन्हाळी भुईमूग काढणीस व्यत्यय आला आहे. अद्यापही अनेक झाडावर असणारे गावठी आंबे वाऱ्याने पडून आंबा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Lx8xhwAA

📲 Get Satara News on Whatsapp 💬