[solapur] - स्मशानभूमींतून १४० टन कचरा जमा

  |   Solapurnews

स्मशानभूमींतून १४० टन कचरा जमा

सोलापूर

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी सकाळी शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये स्वच्छता करण्यात आली. सुमारे एकशे चाळीस टन कचरा जमा झाला. शहरातील सर्व स्मशानभूमीत व कब्रस्तानमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आली होती. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीतील काटेरी झुडपे काढण्यात आली. पालापाचोळा, प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. या कार्यासाठी शहरातील स्मशानभूमीत ४०००पेक्षा जास्त सदस्य सहभागी झाले होते. जवळपास १४० टनांपर्यंत शहरातील कचरा गोळा करण्यात आला. महानगरपालिकेच्या वाहनातून व प्रतिष्ठानच्या वाहनातून हा कचरा उचलून योग्य त्या ठिकाणी टाकण्यात आला.

बाळे स्मशानभूमी, देगाव, रूपाभवानी मंदिर जवळील हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान, जुना पुणे नाका, जुना कारंबा नाका, मोदी स्मशानभूमी व कब्रस्तान पद्मशाली स्मशानभूमी. व्हीआयपी रोडवरील मुस्लिम कब्रस्तानात स्वच्छता करण्यात आली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wFfUWwAA

📲 Get Solapur News on Whatsapp 💬