[thane] - जिल्ह्याचा निकाल ७१.७५ टक्के

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेव, पालघर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन पद्धतीने शनिवारी जाहीर करण्यात आला. पालघर जिल्ह्यातून दहावीच्या या परीक्षेला सुमारे ५७,९२२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४१,५५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल ७१.७५ टक्के लागला आहे.

मुंबई विभागात पालघर जिल्ह्याचा सहावा क्रमांक आला आहे. मंडळाने भाषा व समाजशास्त्र या विषयांचे शाळा अंतर्गत देण्यात येणारे २० गुण कमी करून या विषयांची १०० गुणांची बोर्डाची घेतलेल्या परीक्षेचा हा पहिलाच निकाल होय. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ९.९६ टक्के जिल्ह्याचा निकाल कमी लागला आहे.

जिल्ह्यातील ५५१ शाळांमधील ३१ हजार ३०८ मुले आणि २६ हजार ६१४ मुली असे एकूण ५७ हजार ९२२ नियमित विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. जिल्ह्यातील आठ तालुक्यात दहावीसाठी १०४ परीक्षाकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्वाधिक केंद्र वसई तालुक्यात होती. या तालुक्यात दहावीची ५३ केंद्रांवर ३० हजार २० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३ हजार ९४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्यात वसई तालुक्याचा ९७.७७% टक्के असा सर्वाधिक निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल विक्रमगड तालुक्याचा लागला असून या तालुक्यात ४७.६० टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/T6IMvwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬