अभिजित बिचुकलेला खंडणीप्रकरणी न्यायालयीन कोठडी

  |   Maharashtranews

सातारा : अभिजित बिचुकले याचा खंडणीच्या गुन्ह्यात सातारा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. सातारा पोलिसांनी गोरेगाव मुंबई येथून बिचुकलेला अटक केली होती. रात्री छातीत दुखत असल्याचे कारण देऊन सातारा जिल्हा रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. चेक बाऊन्स प्रकरणी त्याला जामीन मिळाला. मात्र यावेळी पोलिसांनी आणखी एका खंडणीच्या गुन्ह्यात त्याला न्यायालयापुढे हजर केले. या गुन्ह्यात बिचुकले याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बिचुकले याच्यावर २०१२ मध्ये सातारा पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला ताब्यात देण्याची आणि पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी न्यायालयाला केली. त्याला जमीन द्यावा, अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली. यावर दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली....

फोटो - http://v.duta.us/xG_RegAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ViBtpAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬