जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्हीवर शिक्षणाचे धडे

  |   Maharashtranews

मुस्तान मिर्झा, उस्मानाबाद : जिल्हा परिषदची शाळा म्हटले की नाक मुरडले जाते. मात्र, जिथे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशीही या शाळेत यावेसे वाटते. उस्मानाबाद जिल्ह्यातील भाटशिरपुरा या छोट्याश्या गावात शिक्षकांच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आली आहे. खासगी शाळांच्या तोडीस ही शाळा बनवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या या डिजिटल शाळेत स्मार्ट टीव्हीवर शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यीही आनंदाने शिक्षण घेताना दिसतात.

राज्यातील जिल्हा परिषद शाळा या कात टाकत असल्याचं चित्र आहे. खासगी शाळा आणि सध्या भरमसाठ फी घेणाऱ्या इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे. शिवाय जिल्हा परिषदेचे शिक्षक आपल्या शाळेची गुणवत्ता टिकवण्यामध्ये ही अपयशी ठरत आहेत. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील भाटशिरपुरा गावातील जिल्हा परिषद शाळा ही आदर्श जि.प शाळा म्हणून जिल्हाभरात नावारूपास येत आहे....

फोटो - http://v.duta.us/QgYWqgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PgXL3AAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬