त्याने लेडीज बारमध्ये पैसे उडवले आणि त्याची चोरी पकडली गेली

  |   Maharashtranews

ठाणे : त्याने लेडीजबारमध्ये पैसे उडवले आणि पकडली गेली चोरट्यांची टोळी. ६ कंपन्यांमध्ये तब्बले ११ लाख रुपयांवर डल्ला मारला होता. दरम्यान, चोरी करणाऱ्यांच्या लाइफस्टाइलवर पोलिसांची करडी नजर होती. त्यामुळे बारमध्ये पैसे उडविल्यानंतर त्याचा पोलिसांनी माग घेतला. तेव्हा धक्कादायक माहिती पुढे आली. कल्याण डोंबिवलीत पोलिसांनी चोरट्यांच्या राहाणीमानावर नजर ठेवायला सुरुवात केली आहे.

रेकॉर्डवरील चोरट्यांवर नजर ठेऊन जो चोरटा जास्त पैसे खर्च करतो, त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली जाते. याचाच फायदा मानपाडा पोलिसांना झाला आहे. चोरी करून लेडीजबारमध्ये पैसे उडवणाऱ्या चोरट्याची चौकशी केल्यानंतर मोठा खुलासा झाला. या चोरट्याने त्याच्या दोन साथीदारांसह डोंबिवली एमआयडीसीतील ६ कंपन्यांमध्ये ११ लाखाची चोरी केली होती.

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी परिसरात गेल्या काही दिवसात विविध कंपन्यांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. पोलीस हैराण झाले होते कारण काही कंपन्यांमधून संपूर्ण फिल्टर प्लांटच चोरीला गेले होते. मानपाडा पोलिसांनी या सर्व चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तीन चोरट्यांना अटक केली आहे, पोलीस अधीक्षक (झोन ३) विवेक पानसरे यांनी ही माहिती दिली.

फोटो - http://v.duta.us/4JemZgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/49rT7wAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬