पारदर्शितेसाठी ग्रामसभांचे राज्यात प्रथमच थेट प्रक्षेपण

  |   Akolanews

ठळक मुद्देजिल्ह्यातील ५२६ पैकी २५२ ग्रामपंचायतींच्या सभांचे थेट प्रक्षेपण झाले. तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, पोटनिवडणुकीमुळे ग्रामसभा झाल्या नाहीत. आॅफलाइन चित्रीकरण केलेल्या ग्रामपंचायतीचे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केले जाणार आहेत.

अकोला : ग्रामीण भागातील विकास योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ग्रामसभा घेत त्यामध्ये पारदर्शिता ठेवण्यासाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा राज्यातील पहिला उपक्रम अकोला जिल्हा परिषदेने शनिवारी राबविला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील ५२६ पैकी २५२ ग्रामपंचायतींच्या सभांचे थेट प्रक्षेपण झाले. तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, पोटनिवडणुकीमुळे ग्रामसभा झाल्या नाहीत. तेथे २५ जून रोजी सभा होणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी २२ जून रोजी विशेष ग्रामसभा घेऊन विविध विषयांचे ठरावही घेण्याचे पत्र सरपंच, सचिवांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक गावातील ग्रामसभेसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली. गावांमध्ये एकाच वेळी झालेल्या ग्रामसभांमध्ये प्रधानमंत्र्यांच्या पत्राचे वाचन करण्यात आले. त्याशिवाय, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ठरवून दिलेल्या नियोजनाच्या पत्रानुसार आयुष्यमान भारत योजनेची लाभार्थी यादी वाचन, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी ‘सेल्फ’ तयार करणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव कुटुंबांची यादी तयार करणे, जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाºया सर्व योजनांची माहिती देणे, रमाई घरकुलासाठी लाभार्थी निवड करणे, पाण्याचे महत्त्व पटवून देणे, पाणी संवर्धनासाठी श्रमदान करावे, त्यामध्ये ग्रामस्थांना सहभागी करून घेण्यात आले. ज्या तहकूब झालेल्या ग्रामपंचायतींच्या सभांमध्ये सर्व विषयाचे वाचन व माहिती देण्यात आली. लाभार्थी निवड करण्यात आली नाही. तसेच आॅफलाइन चित्रीकरण केलेल्या ग्रामपंचायतीचे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केले जाणार आहेत....

फोटो - http://v.duta.us/LB0hZwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/SwucpQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬