पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची राजस्थानातून सुटका; आरोपी गजाआड

  |   Akolanews

अकोट(अकोला) : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या एका गावातून १७ वर्षीय मुलीला गावातील दोघांनी पळवून नेले होते. या मुलीला दोघांनी राजस्थान येथे नेउन तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून पिडीत मुलीची राजस्थानातून सुटका केली तसेच एका आरोपीस गजाआड केले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या एका गावातील १७ वर्षीय मुलगी १६जून रोजी अकोटात संगणक शिकायला जात असल्याचे सांगून बेपत्ता झाली होती. याच गावातील एक १७ आणि २३ वर्षीय युवकही बेपत्ता झाल्याची तक्रार अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला १६ जून रोजी दाखल झाली होती.दोन युवकांनी अल्पयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. ठाणेदार ज्ञानोबा फळ यांनी कुठलीही दिशा मिळत नसताचा तपास सुरूच ठेवला. दोन्ही युवकांनी अल्पवयीन मुलीला गुजरात राज्यातील वापी येथे नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ग्रामीण पोलिसांचे पथक वापी येथे रवाना करण्यात आले. मात्र, वापी येथे पथक पोहचण्यापूर्वीच ते तिघे उदयपूरजवळ गेल्याची माहिती पेलिसांना मिळाली. पथकाने उदयपूर गाठून तेथे स्थानिकांना बेपत्ता झालेल्या तिघांचे फोटो दाखवले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघेही राहत असलेल्या घरात धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. या ठिकाणी त्यांना विचारपुस केली असता सदर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने फुस लावुन पळवुन नेले.तसेच तिच्यावर या कालावधीत लैंगीक अत्याचार केल्याचे समोर आले. यामध्ये त्याला त्याच्या सोबत असलेल्या रविंद्र झगडे याने सुरवातीपासुन सहकार्य केल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीसांनी एक अल्पवयीन मुलगा व रविन्द्र झगडे याच्याविरूध्द भादंवी कलम ३६६ अ, ३७६ (२) एन, सहकलम ३ अ, ४ पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला आहे. पिडीत मुलीची व अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले,तर आरोपी रविन्द्र वसंतराव झगडे यास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड, पोउपनि सुवर्ना गोसावी, एएस.आय. नारायण वाडेकर, गजानन भगत, अनिल षिरसाट, प्रविण गवळी व नंदु कुलट यांनी केली.

फोटो - http://v.duta.us/MyZahgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5livcgAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬