शेतकरी अडचणीत; पीक कर्ज वाटप १९ टक्क्यावरच!

  |   Akolanews

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असले तरी, २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० हजार ३७४ शेतकºयांना २६८ कोटी ३९ लाख रुपये (१९ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अचडणीत सापडला असताना, पीक कर्जाचे वाटप १९ टक्क्यावरच असून, खरीप पेरणी तोंडावर असताना जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ४७३ शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात गत १ एप्रिलपासून बँकांमार्फत शेतकºयांना पीक कर्ज वाटप सुरू करण्यात आले. अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र उद्दिष्टाच्या तुलनेत २० जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० हजार ३७४ शेतकºयांना २६८ कोटी ३९ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १ लाख ४४ हजार ४७३ शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा अद्याप लाभ मिळाला नाही. दुष्काळी परिस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांजवळ पैसा नाही आणि पीक कर्ज मिळत नाही, अशा परिस्थितीत खरीप पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होऊन वीस दिवस उलटले असून, खरीप पेरणी तोंडावर आली असताना पीक कर्जाचे वाटप अद्याप १९ टक्क्यावरच असल्याने, जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ७४३ शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे....

फोटो - http://v.duta.us/eQFcwAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/X2gN4gAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬