खा. रणजितसिंह ना. निंबाळकर : सातार्‍यात ‘पुढारी’कारांना अभिवादन

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

माढा लोकसभा मतदार संघातील जनतेला आजवर दिग्गज नेत्यांनी फक्‍त आश्‍वासने दिली. आता मात्र तसे घडणार नाही. या लोकसभा मतदार संघातील दुष्काळमुक्‍तीचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले असून सोमवारी केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्‍लीत फक्‍त माढा मतदार संघाबाबत महत्वपूर्ण बैठक होत असल्याची माहिती खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.

खासदार झाल्यानंतर प्रथमच ते सातार्‍यात ‘पुढारी’ कार्यालयात आले. ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांना त्यांनी अभिवादन केले. यावेळी माढा लोकसभा मतदार संघाबाबत टीम ‘पुढारी’ने त्यांच्याशी संवाद साधला.

खा. रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, माढा लोकसभा मतदार संघात सोलापूर व सातारा जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश होतो. या भागातील जनतेला आजवर आश्‍वासने दिली गेली. मात्र, दुष्काळ हटला नाही. फलटण, माण, खटाव, उत्तर कोरेगाव या चार तालुक्यांनाही झुलवत ठेवण्यात आले. मात्र, पाणी दुष्काळी भागात पोहोचले नाही. त्याचाच राग जनतेने काढला. प्रस्थापितांच्या विरोधात जनतेने मला साथ दिली. त्यामुळे या भागातील जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करणे हे माझे काम आहे आणि खासदार झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मी कामाला लागलो आहे. आपल्या भागाच्या वाट्याचे पाणी आपल्याला मिळाले पाहिजे यासाठी माझा आग्रह आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/drought-free-madha-planning-start-in-madha-says-MP-ranjeetsingh-nimbalkar/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/drought-free-madha-planning-start-in-madha-says-MP-ranjeetsingh-nimbalkar/

📲 Get Satara News on Whatsapp 💬