ग्राहकांना दर्जेदार अखंडीत सेवा पुरवा! - केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे निर्देश

  |   Akolanews

अकोला : इंटरनेट ही आधुनिक काळातील अत्यावश्यक गरज झाली आहे. ही सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांनी स्वत:चा फायदा नंतर आधी प्रत्येक ग्राहकाला दर्जेदार तसेच अखंडीत सेवा पुरविण्याचे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास, दुरसंचार व माहिती तंत्रज्ञान केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांनी दिले. स्थानिक बीएसएनल कार्यालयात आयोजीत बीएसएनएल आणि खाजगी टेलीकॉम आॅपरेटर्सच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते.

केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांनी भारत संचार निगम लिमीटेड कार्यालयात संबंधित विभाग आणि खाजगी टेलीकॉम कंपनीच्यावतीने जिल्ह्यात उपलब्ध केल्या जाणाºया सुविधेचा आढावा घेतला. यादरम्यान, एअरटेल, रिलायन्स जीओ, आयडीया आदी कंपन्यांचे अनेक भागात नेटवर्कमध्ये वारंवार अडथळा निर्माण होत असल्याचे लक्षात आले. नागरीकांना इंटरनेट आणि मोबाईल डाटाची गरज लक्षात घेता, ग्राहकांना नेटवर्क देण्यासाठी संबंधित कंपन्यांनी कोणत्या प्रकारचे नियोजन केले, याबाबत ना.धोत्रे यांनी माहीती घेतली. दरम्यान खाजगी टेलीकॉम आॅपरेटर्सनी नेटवर्कची समस्या निकाली काढण्यासाठी आढावा अवधी मागितला. या अवधीत समस्या निकाली काढण्याचे ना.संजय धोत्रे यांनी दिले. पुरेशा नेटवर्कसाठी मोबाईल टॉवर्स उभारण्याचा पर्याय असला तरी शहरात जागेची समस्या असल्याचे सांगण्यात आले. यावर ना.धोत्रे यांनी अल्पशा भाड्यात नागरीक कोट्यवधी रुपयांच्या जागा तुम्हाला वापरायला देणार नाहीत. त्यामुळे नागरीकांना जागेचा वापर करता येईल आणि तुमचे टॉवर देखील बांधता येईल, असे पर्याय शोधण्याची सूचना त्यांनी केली. कंपन्यांनी स्वत:च्या फायद्याचा विचार न करता, ग्राहकांना दजेर्दार सुविधा देण्यावरही लक्ष केंद्रीत करण्याची सूचना ना.धोत्रे यांनी केली. या बैठकीला बीएसएनएलचे महाव्यवस्थापक पवन बारापत्रे, दुरसंचार विभाग नागपुरचे राजेंद्र मेश्राम, अशोक मोहबे, अजय मेहत्रे, बीएसएनएल अकोलाचे अन्सारखान, एस.के.चैताणी, सी.आर.ढोले, प्रशांत पोफळे, व्ही.डी.मिश्रा आदींसह खासगी कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/-GOoZgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GADQaAAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬