चौघांना मंत्रिपदाची शपथ

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार बाबू कवळेकर, फिलीप नेरी रॉड्रिग्स, जेनिफर मोन्सेरात आणि भाजपचे आमदार मायकल लोबो यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून त्यांनी शनिवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी दोनापावला येथे पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी भाजप युती सरकारचे घटक असलेल्या गोवा फॉरवर्डचे आमदार तथा उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, मंत्री जयेश साळगावकर, मंत्री विनोद पालयेकर तसेच अपक्ष आमदार तथा मंत्री रोहन खंवटे यांना मंत्रिमंडळातून वगळले.

मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुक्रवारी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचेनिर्देश दिले होते. मात्र त्यांनी राजीनामे न दिल्याने त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मुख्यमंत्र्यांनी शनिवारी जारी केलेली शिफारस राज्यपालांनी मंजूर केली. माजी चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याची अधिसूचना सर्वसामान्य प्रशासन खात्याचे संयुक्त सचिव गौरीश कुर्टीकर यांनी जारी केली. त्यानुसार या चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शिफारशीला राज्यपालांनी मंजुरी दिली....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Four-new-ministers-were-included-in-the-state-cabinet/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/Four-new-ministers-were-included-in-the-state-cabinet/

📲 Get goanews on Whatsapp 💬