चंद्रपुरात जोडप्याचे अनोखे समाजभान; लग्नमंडपातच राबविले रक्तदान शिबीर

  |   Maharashtranews

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : आयुष्यातील सर्वोच्च आनंदाच्या क्षणीदेखील समाजभान जपणारे काही मोजकेच. चंद्रपूरच्या अलमस्त आणि गिरडकर कुटुंबीयांनी आज अशीच आस्था दाखविली. आपल्या मुलांच्या लग्नात त्यांनी चक्क रक्तदान शिबीर राबविले. विशेष म्हणजे नवरदेवही यात रक्तदाते झाले आणि 'आधी केले मग सांगितले' या उक्तीचा प्रत्यय दिला.

ही चंद्रपूरकर जोडी शहरातील बल्लारपूर वळण मार्गावरील उत्सव सभागृहात विवाहबंधनात अडकली. हा सोहळा खास ठरला तो या लग्नमंडपात मुद्दाम आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामुळे. आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सर्वोच्च आनंदाच्या क्षणी आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव असणे आणि काही ठोस कृती प्रत्यक्षात आणणे हे दिव्यच. मात्र चंद्रपूरच्या अलमस्त आणि गिरडकर कुटुंबाने नवविवाहीत जोडप्याच्या सूचनेला स्वीकारले आणि विवाहसोहळ्याला समाजभानतेची झालर मिळाली....

फोटो - http://v.duta.us/9sz6eAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/w4s7kwAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬