पावसाचे इंचाचे अर्धशतक पार

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

राज्यात पावसाने अखेर शनिवारी अर्धशतक गाठले असून इंचांची पन्नाशी पार केली आहे. राज्यात 1 जून ते 13 जुलै दरम्यान एकूण 1313.6 मि. मी. म्हणजेच 52 इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी 6 जुलै 2018 रोजी पावसाने इंचांचे अर्धशतक पार केले होते.

राज्यात यंदा 20 जून रोजी मान्सून दाखल झाला. मान्सूनचे तेरा ते चौदा दिवस उशिरा आगमन झाले. त्यानंतर काही दिवस पावसाचा जोर कमीच होता. जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पावसाचे अर्धशतकही लांबले. गेल्या आठवड्यापासूनच धो-धो पावसाला सुरुवात झाली. त्यातूनच पावसाच्या पाण्याची तूटही भरून निघाली आहे. सध्या पावसाची तूट केवळ 2 टक्के राहिली असल्याची माहिती गोवा वेधशाळेने दिली....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/complete-rain-inches-half-century-in-goa/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/complete-rain-inches-half-century-in-goa/

📲 Get goanews on Whatsapp 💬