हातरुण येथील पुलाजवळ पाणी साचल्याने ग्रामस्थ त्रस्त

  |   Akolanews

हातरुण: हातरुण ते बोरगाव वैराळे आणि कारंजा रमजानपूर या मार्गावर आश्रमशाळेसमोर असलेल्या टी-पॉइंटवर चार महिन्यांपूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. पुलाच्या दोन्ही बाजूंनी मातीचे ढिगारे असल्याने पुलाखालून पाणी वाहून जात नाही. त्यामुळे पुलाच्या बाजूने पाण्याचा तलाव निर्माण झाला आहे. या पुलाखालून पाणीच वाहत नसल्याने हा पूल सध्या शोभेची वास्तू ठरला आहे.

शासनाने हजारो रुपये खर्च करून टी-पॉइंटजवळ पुलाचे काम पूर्ण केले. पुलाचे बांधकाम करताना खोदून ठेवलेली माती अजूनही त्याच ठिकाणी कायम आहे. पुलाच्या दोन्ही काठांनी मातीचे ढिगारे असल्याने पुलाखालून पाणी वाहून जात नाही. पाण्याची विल्हेवाट लावण्यात न आल्याने पुलाच्या एका बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुलाचे बांधकाम केल्यानंतर संबंधित विभागाला या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे....

फोटो - http://v.duta.us/zti4xAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/V2XavAAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬