[ahmednagar] - एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या

  |   Ahmednagarnews

शिर्डीजवळील घटना; शेजाऱ्याने कापले गळे

म. टा. प्रतिनिधी, नगर

राहाता तालुक्यातील निमगाव येथे वस्तीवर शनिवारी (१३ जुलै) सकाळी साडेदहाच्या सुमारास शेजारी राहणाऱ्याने शेजारच्या एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नामदेव भिका ठाकूर (वय ६२), दगाबाई नामदेव ठाकूर (वय ५४), खुशी सुनील ठाकूर (वय १६) अशी हत्या केलेल्यांची नावे आहेत. घराजवळ लघुशंका करणे, कचरा टाकणे अशा किरकोळ कारणांतून शेजारी राहणाऱ्या अर्जुन किसन पन्हाळे (वय ४५) याने कोयत्याने सपासप वार करून हे हत्याकांड केल्याचे समोर येत आहे. त्याच्या हल्ल्यात दोघे जण बचावले आहेत. या दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर शिर्डी संस्थान रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी अर्जुन पन्हाळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/B9VuGgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬