[ahmednagar] - मजले चिंचोलीच्या आव्हाड यांचे सदस्यत्व रद्द

  |   Ahmednagarnews

महिला सरपंचांच्या बोगस सह्याप्रकरणी दोषी

म. टा. वृत्तसेवा, नगर

मजले चिंचोली येथील ग्रामपंचायत सदस्य धर्मनाथ आव्हाड यांनी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी त्यांना दोषी ठरवून त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले आहे.

याबाबतची माहिती अशी की, 'नगर तालुक्यातील मजले चिंचोलीच्या तत्कालीन सरपंच गीतांजली आव्हाड यांना अंधारात ठेऊन तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आव्हाड यांनी ग्रामसेवक श्रीकांत जऱ्हाड यांना हाताशी धरून जलयुक्त शिवार योजनेच्या नावाने महाराष्ट्र बँक व जिल्हा सहकारी बँकेमध्ये सरपंचांना कुठलीही कल्पना न देता खाते उघडून बेकायदेशीर व्यवहार केला. याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या राजीव गांधी पतसंस्थेमध्ये सरपंचांना कल्पना न देता तत्कालीन आव्हाड व तत्कालीन ग्रामसेवक श्रीकांत जऱ्हाड यांनी संयुक्त सहीने परस्पर कागदपत्रे बनवून पाणीपट्टीचे अनधिकृत खाते उघडले होते. ग्रामस्थांकडून पाणीपट्टीच्या रकमा भरून घेऊन आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. त्यावर धर्मनाथ आव्हाड यांनी सरपंच हे स्थानिक रहिवासी नसल्याचा आरोप करत, आपण कुठल्याही स्वरुपाचा भ्रष्टाचार केला नसल्याचे आयुक्तांसमोर वकिलांमार्फत सांगितले. विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी याप्रकरणी कागदपत्रे तपासून धर्मनाथ आव्हाड यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश नगरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/cFjkuwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬