[ahmednagar] - वाहनचालकांना लुटणारे दोघे गजांआड

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

महामार्गावर वाहनचालकांना अडवत मारहाण करून लुटणारे दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. रमेश सावत्या उर्फ सावंत भोसले (वय २६) आणि तुषार सावत्या उर्फ सावंत भोसले (वय २२, दोघे रा. पिंपळगांव कौडा, नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

नगर येथील सारसनगर परिसरात राहणारे सुमीत मनोज सावंत हे त्यांच्या मित्रासमवेत १७ मे २०१९ला पहाटेच्या सुमारास दुचाकीवर पुणे येथून नगरला येत होते. पहाटे साडेचारच्या सुमारास ते कामरगाव घाट येथे आले असता, त्यांच्या दुचाकीमधील पेट्रोल संपले. त्यामुळे सुमीत सावंत यांनी त्यांच्या मित्राला घाटाच्या खाली सोडले, व ते दुचाकी ढकलत पेट्रोल भरण्यासाठी जात होते. त्या वेळी एका दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी सुमीत सावंत यांना चाकुचा धाक दाखवून त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडे असणारी दुचाकी, रोख रक्कम व एटीएम कार्ड असा एकूण ४३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी सुमीत सावंत यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी शनिवारी (१३ जुलै) कामरगाव येथील आठवडे बाजारात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुका पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रमेश सावत्या व तुषार सावत्या यांना बाजारात येताच पकडले. आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा कबूल केला, व आत्मा सावत्या उर्फ सावंत भोसले (रा. पिंपळगाव कौडा, ता.नगर) हा सोबत असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वीही सावत्या उर्फ सावंत अकल्या भोसले (रा. पिंपळगाव कौडा, ता.नगर) याच्यासोबत नगर-पुणे रोडवर चास शिवार, कामरगाव शिवार, कामरगाव घाट येथे जबरी चोरी केल्याची कबुली दिली. या आरोपींविरोधात नगर तालुका, सुपा पोलिस स्टेशन, श्रीगोंदा पोलिस स्टेशन, अशा विविध पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी नगर तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे....

फोटो - http://v.duta.us/nG87nAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/nr9vpwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬