[ahmednagar] - सोनईत तीन तास रास्ता रोको

  |   Ahmednagarnews

अठरा गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा मागणी

म. टा. वृत्तसेवा, नेवासे

सोनई-करजगाव पाणी योजना सुरळीत व्हावी, यासाठी सोनई येथे ग्रामस्थांनी शनिवारी सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाहनांची दुतर्फा कोंडी झाली होती. 'सोनई-करजगावसह सोळा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी प्रादेशिक पाणीयोजना अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे तेरा दिवसांपासून बंद असल्याचा आरोप माजी आमदार शंकरराव गडाख यांनी या वेळी केला.

या वेळी गडाख म्हणाले की, 'योजना अपूर्ण असताना अधिकाऱ्यांना बिले दिली कशी? फक्त टंचाईकाळात पिण्याच्या पाण्यासाठी राहुरी तालुक्यातील तीन गावांना पाणी देण्याचे आदेश असताना दोन वर्षांपासून अनधिकृतपणे कनेक्शन कशी दिली? तेरा दिवसांपासून १८ गावांतील ८० हजार लोक पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. त्यांना पाणी कधी मिळणार? अपूर्ण कामे करण्यासाठी अधिकारी व ठेकेदारांकडून वसुली करून पाणीयोजना पूर्ण करा. राहुरी तालुक्यातील अनधिकृत कनेक्शन बंद करून १८ गावांना त्वरीत पाणीपुरवठा सुरू करावा.'...

फोटो - http://v.duta.us/AT7VNQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/nOeRJgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬