[aurangabad-maharashtra] - २५ हजार घरांचा प्रकल्प

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्यातील गरिबांना हक्काचे घर मिळावे या दृष्टिकोनातून म्हाडाने नवीन गृहप्रकल्प हाती घेतला आहे. मराठवाड्यात तब्बल २०० हेक्टरवर २५ हजार घरे उभारण्यात येणार असून, त्यासाठी जमीन संपादनाबाबत पुढाकार घेण्यात येणार आहे,' अशी माहिती म्हाडाचे नवनिर्वाचित सभापती संजय केणेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारने नुकत्याच महामंडळावरील सभापतींच्या नियुक्त्या घोषित केल्या आहेत. त्यात केणेकर यांची म्हाडाच्या सभापतिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर शनिवारी म्हाडाच्या कार्यालयात पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत केणेकर म्हणाले, '२०२२पर्यंत सर्वांना देण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या माध्यमातून मोठा प्रयत्न केला जाणार आहे. अत्यल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट अशा पाच गटातील कुटुंबांसाठी एक नवीन प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न म्हाडाच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीर्ण झालेल्या म्हाडाच्या इमारतींचे पूर्नजीविकरण करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणात ठेवण्यात आला असून, त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.' पत्रकार परिषदेला म्हाडाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/mtK27QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/99AixwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬