[jalgaon] - बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल

  |   Jalgaonnews

चिमुकल्या वारकऱ्यांच्या भक्तिरसात श्रोते चिंब

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘ऊठ पांडुरंगा आता’, ‘रूप पाहता लोचनी‘, ‘ऊठ पंढरीच्या राजा’ असे एकापेक्षा एक अंभग सादर करीत चिमुकल्या वारकऱ्यांनी आषाढीच्या सायंकाळी जळगावकर श्रोत्यांना भक्तिरसात चिंब केले.

स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित व डॉ. भवरलाल व कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशनच्या सौजन्याने आषाढी एकादशीनिमित्त ‘बोलावा विठ्ठल’ या भक्तिरसाने ओथंबलेल्या कार्यक्रमाचे आयोजन आषाढी एकादशीनिमित्त सायंकाळी कांताई सभागृहात करण्यात आले होते. हा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे लहान मुलांकडून सादर केला गेला, संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजेपर्यंत रिंगण व ६.३० वाजेपासून विठ्ठलाचे अभंग गायन व समूह नृत्याचे विविध शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादरीकरण केले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठान मागील सहा वर्षांपासून सातत्याने करीत असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थी व पालकांकडून मिळत असतो. या आषाढीच्या वारीत ब. गो.शानबाग विद्यालय, काशिनाथ पलोड विद्यालय, अडवोकेट अच्युतराव अत्रे विद्यालय, डॉ. अविनाश आचार्य विद्यालय, प. न. लुंकड कन्या शाळा, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, सेंट जोसेफ स्कूल, रुस्तमजी आंतरराष्ट्रीय स्कूल, अनुभूती आंतरराष्ट्रीय स्कूल, अनुभूती इंग्लिश स्कूल, गोदावरी इंग्लिश स्कूल, गांधर्वी कथक नृत्यालय व प्रभाकर कला संगीत अकादमी या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/XzYXxwAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬