[mumbai] - सेनेचा मोर्चा ही नौटंकी

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी. मुंबई

राज्याच्या सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावता आलेले नाहीत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री गप्प बसतात आणि बाहेर येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची भाषा करतात. हा प्रकार म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरची शिवसेनेची नौटंकी आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

सत्ताधारी पक्षाने जनतेचे प्रश्न मार्गी लावायचे असतात. संबंधित यंत्रणेला आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करून घ्यायची असते मात्र शिवसेनेचे सरकारमध्ये काहीही चालत नाही अशी टीका करून, सत्ताधारी असूनही विरोधी पक्षासारखे शिवसेनेला आंदोलने करण्याची भाषा करावी लागते. शिवसेनेचा पीक कंपन्यांच्या विरोधातील मोर्चा म्हणजे पुतणा मावशीचे प्रेम आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेतील सर्व ८९ लाख शेतकऱ्यांची यादी तपासून घेण्याची वल्गना शिवसेनेने केली होती, त्यानंतर बँकांसमोर ढोल बडवण्याची भाषाही केली होती, पण प्रत्यक्षात अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. शिवसेनेला कोणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांना जर शेतकऱ्यांचा कळवळा असता तर पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नाडवत असताना सरकारी पातळीवरूनच त्यांचा बंदोबस्त करता आला असता पण ते त्यांना शक्य नाही म्हणूनच ते मोर्चाचा स्टंट करीत आहेत, असे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे....

फोटो - http://v.duta.us/p7vnvQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/26VEIAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬