[nagpur] - अकोला, यवतमाळचाही ‘विमान’विकास

  |   Nagpurnews

म. टा. वृत्तसेवा, अमरावती

उद्योगांच्या भरभराटीसाठी विमानतळाची सेवा अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे अमरावतीप्रमाणेच आता पश्चिम विदर्भातील अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील विमानतळांचा गतीने विकास करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अमरावतीच्या बेलोरा विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन व विविध कामांचे लोकार्पण शनिवारी झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे, सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, राज्य शिक्षण सल्लागार परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपमहापौर संध्या टिकले, खासदार नवनीत राणा, रामदास तडस, आमदार रवी राणा, अ‍ॅड. यशोमती ठाकूर, अरूण अडसड, प्रवीण पोटे-पाटील, रमेश बुंदेले, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी विमानात प्रवास करणे केवळ मूठभर लोकांना शक्य होते. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान योजना अस्तित्वात आणली. त्यामुळे मध्यमवर्गीयदेखील विमानात प्रवास करीत आहेत. हवाई चप्पल घालणाऱ्यांना हवाई सफर करता यावा, हाच सरकार हेतू आहे. विमानतळाचा विकास २० ते ३० टक्क्याने होत असल्याचेही ते म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/90-dEAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/pAuKCwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬