[nagpur] - मेट्रो कर्मचाऱ्यांनी मांडली गडकरींकडे व्यथा

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

कुठलीही नोटीस न देता मेट्रो कर्मचाऱ्यांचे वेतन कमी करण्यात आले, अनेकांचा पीएफ भरला नाही, अवघ्या पावणे दोन महिन्यांचा करार करून वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून काम करवून घेतले जात आहे,… या विरोधात आवाज उचलला तर काम सोडा, असे सुनावले जाते…. अखेर या जाचाला कंटाळून मेट्रो रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धाव घेऊन आपली व्यथा मांडली.

नागपूर मेट्रोत ग्रेटवॉल सर्विस लिमिटेड या कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केंद्राच्या नियमानुसार वेतन देण्यात आले. मात्र आता अचानक राज्याचा नियम लागू केल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन ५८ पेक्षा अधिक टक्क्यांनी कमी केले. वेतन कमी करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना तशी नोटीसही देण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांवर झालेला हा अन्याय दूर व्हावा, यासाठी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या नेतृत्वात मेट्रो कर्मचारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गेले. आपल्या पेमेंट स्लिप दाखवून कसा अन्याय झाला ही व्यथा या कर्मचाऱ्यांनी गडकरी यांच्यापुढे मांडली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/C-s6jAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬