[nashik] - ‘नेट’चा निकाल जाहीर

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या वतीने घेण्यात आलेल्या नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच 'नेट' परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. देशातील सहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी ५५ हजार ७०१ विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्र ठरले असून, जेआरएफ म्हणजेच कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्तीसाठी ४ हजार ७५६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

ऑनलाइन माध्यमातून २० ते २८ जून या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. देशभरातील ९१ शहरांमध्ये ८४ विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. निकाल जाहीर होण्याची तारीख १५ जुलै देण्यात आली असली तरी, दोन दिवस अगोदरच निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांना ntanet.nic.in या वेबसाइटवर 'व्ह्यू रिझल्ट-यूजीसी नेट जून २०१९' या पर्यायावर क्लिक करा. अॅप्लिकेशन किंवा रोल नंबर, जन्मतारीख टाकून सबमिट म्हटल्यावर निकाल बघता येणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/px9zOwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬