[pune] - ठेवी गुंतवणुकीसाठी महापालिकेचे धोरण

  |   Punenews

कोट्यवधी रुपयांच्या नुकसानानंतर पालिकेचे पाऊल

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेच्या ठेवी योग्य प्रकारे न गुंतविल्याने गेल्या काही वर्षांत सुमारे ७५ कोटी रुपयांच्या नुकसानाला सामोरे जावे लागल्याने महापालिका प्रशासनाने या ठेवी गुंतविण्यासाठी धोरण तयार केले आहे. महापालिकेचा निधी सरकारी तथा खासगी बँकांमध्ये गुंतविण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला असून तो लवकरच महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. आयुक्तांच्या मान्यतेने हा मसुदा स्थायी समितीला सादर केला जाणार आहे.

महापालिकेकडून त्यांच्याकडे जमा होणारा निधी, ठेवी यांची बँकांमध्ये गुंतवणूक केली जाते. या ठेवी स्थायी समितीच्या मान्यतेने बँकांमध्ये ठेवण्यात येत असल्या, तरी त्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन जपला जात नसल्याने महापालिकेला त्याचा कोट्यवधी रुपयांना फटका बसतो. या पार्श्वभूमीवर या ठेवी बँकांमध्ये ठेवण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन जपण्याबरोबरच राज्य सरकारने घालून दिलेल्या निमयांचेही पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने एक धोरण तयार केले आहे. हे धोरण महापालिका आयुक्तांना सादर करण्यात येणार असून त्यानंतर ते स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/AbDL2AAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬