[pune] - संतांच्या विचारांपासून आपण दूर गेलो आहोत

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'संत कमी शब्दांत बरेच काही सांगून जातात. त्यांच्या साहित्याचा, वचनांचा आणि विचारांचा प्रभाव खूप मोठा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी त्यांच्या विचारांमधून बराच काळ पशुप्रवृत्तीला, दुष्टपणाला आळा घातला होता. आज लोक त्याच विचारांपासून दूर गेले आहेत. त्यामुळेच वाईट प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत,' अशी खंत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'हेरिटेज द आर्ट लिगसी' व 'अनाहत' यांच्यातर्फे 'घन अमृताचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या संतरचनांचे सादरीकरण करण्यात आले. गायिका सावनी रवींद्र यांनी ही गीते सादर केली. मंगेशकर यांनी या गीतांचे निरूपण करून, गीतांच्या निर्मितीच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला. विघ्नेश जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमात 'हेरिटेज क्लब'चे उद्घाटनही करण्यात आले. क्लबचे संचालक डॉ. योगेश चांदोरकर उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/1I16EwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/CAej2QAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬