आमठाणे धरण तुडुंब; अंजुणेच्या पातळीतही वाढ

  |   Goanews

डिचोली : प्रतिनिधी

मुसळधार पावसाचा जोर चालूच असल्याने आमठाणे धरणाच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत आहे. अखेर मंगळवारी दुपारी हे धरण पूर्णपणे 50 मीटरहून अधिक तुडुंब भरले असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जलसंसाधन खात्याचे अभियंता के. पी. नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सतत पावसाचा जोर चालू असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरण लवकर भरले आहे.पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून पाणी पार, नानोडा नदीत जात असल्याने त्याठिकाणी पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अंजुणेच्या पातळीतही वाढ

अंजुणे धरण परिसरात पावसाचा जोर चालूच असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली आहे. आतापर्यंत 2010 मि.मी. पाऊस झाला. धरणाची पातळी 83 मिटरहून अधिक झाली आहे, अशी माहिती धरण अधिकारी हुडदगड्डी व पवाडी यांनी दिली. पावसाचा जोर चालूच असल्याने काही दिवसांत हे धरणही 93.45 मीटर पर्यंत पूर्ण भरणार असून पाणी सोडण्यासाठी दरवाजे खुले केले जातील, असे त्यांनी सांगितले.

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/amthane-Dam-was-full/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/amthane-Dam-was-full/

📲 Get goanews on Whatsapp 💬