[kolhapur] - निम्म्या शहरात शुक्रवारपासून पाण्याचा ठणठणाट

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बालिंगा उपसा केंद्र व नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या उच्च दाबाची वीजपुरवठा लाइनची दुरुस्ती शुक्रवारी (ता. २६) करण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारसह शनिवारी ए, बी, सी व डी वॉर्डातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. महापालिका व शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.

बालिंगा उपसा केंद्र ते नागदेवाडी अशुद्ध जल केंद्रादरम्यानच्या ११ के.व्ही दाबाच्या वीजपुरवठा करणाऱ्या लाइनमधील फोरपोलमध्ये बिघाड झाला आहे. फोरपोलमधील दुरुस्तीला शुक्रवारपासून सुरुवात होणार असल्याने दोन्ही उपसा केंद्रातील विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार असल्याने ए, बी, सी, व डी वॉर्डातील पाणीपुरवठा बंद राहील. शुक्रवारी दुरुस्ती पूर्ण झाली तरी, शनिवारीही निम्म्या शहरात अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4c_1hQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬