कॅसिनोविरोधात मोर्चाचे आयोजन

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

पणजी कॅसिनो नगरी बनली आहे. सरकारने पणजी कॅसिनो माफीयांच्या घशात घातली असून याचा गोवा सुरक्षा मंचने तीव्र शब्दात निषेध केला. कॅसिनोविरोधात आंदोलनाची सुरवात म्हणून बुधवार 10 जुलै रोजी शहरात मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती मंचचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप काळात झालेल्या कॅसिनोंच्या व्यवहारांची श्‍वेतपत्रिका जारी करावी ही प्रमुख मागणी या मोर्चात केली जाणार असल्याची माहिती त्यांनी केली. वेलिंगकर म्हणाले, मंचकडून कॅसिनो हा विषय धसास लावला जाणार आहे. कॅसिनोमुळे गोव्याच्या संस्कृतीचे विकृतीकरण होत आहे. मांडवीतून कॅसिनो हटवणार असे भाजपकडून फक्‍त आश्‍वासन देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपने 2012 च्या विधानसभा निवडणूकीत सत्तेवर येताच मांडवीतून कॅसिनो हटवणार असे आश्‍वासन दिले होते. 2012 पासून भाजप कॅसिनोप्रश्‍नी केवळ फसवणूक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Organize-a-rally-from-the-Goa-Security-Forum-against-the-casinos/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/Organize-a-rally-from-the-Goa-Security-Forum-against-the-casinos/

📲 Get goanews on Whatsapp 💬