घोडे चोरणाऱ्या टोळीला दहीहांडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

  |   Akolanews

अकोला : दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करतवाडी येथून तळेगाव येथील तीन चोर्यांनी दोन घोडे चोरी केले. हे घोडे अकोट रोडने घेऊन जात असताना या चोरट्यांना दहीहांडा पोलिसांनी रंगेहात अटक केली होती. तपासानंतर पोलसांनी गुन्हे दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता या चोरट्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी तर त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे; मात्र याच चोरांच्या गावात चार चोरीचे घोडे बांधलेले असून, सदर घोडे या चोरट्यांनी चोरल्याची माहिती आहे. त्या घोडे चोरीचा पर्दाफाश हिवरखेड पोलीस तसेच अकोट उपविभागीय अधिकाºयांनी लक्ष घालून करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी तसेच घोडे चोर नासीर शहा हमीद शहा, अक्षय इंद्रभान वानखडे आणि निसार शहा हमीद शहा या तीन आरोपींना दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी करतवाडी येथून घोडे चोरी करताना रंगेहात अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून या तीनही घोडे चोरांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर तीनही चोरट्यांची कारागृहात रवानगी केली. दरम्यान, या तीनही चोरट्यांच्या गावात चार चोरीचे घोडे बांधलेले असल्याची माहिती दहीहांडा पोलिसांना देण्यात आली; मात्र तोपर्यंत आरोपींची कारागृहात रवानगी झाल्याने दहीहांडा पोलिसांना कारवाई करण्यास अडचणी आल्या; मात्र तळेगावात बांधलेले घोडे हे चोरीचे असल्याचा तपास त्यांनी केला असून, सदर प्रकरण हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्यामुळे तळेगाव येथे बांधलेल्या चार चोरीच्या घोड्यांचा तपास अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी हिवरखेड पोलिसांकडून करून घेण्याची मागणी करण्यात येत आहे. हिवरखेड येथे बांधलेले चोरीचे घोडे हे याच तीन चोरट्यांनी चोरल्याची माहिती असून, त्यांना संबंधित पोलिसांनी ताब्यात घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज आहे.

फोटो - http://v.duta.us/FMRCrQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Caj8TQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬