पराभवानंतरही काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये उत्साह

  |   Akolanews

ठळक मुद्देअकोला पश्चिममध्ये सर्वाधिक १३ उमेदवारी अर्ज काँग्रेसकडे आले आहेत.काँग्रेसमधील इच्छुक कंबर कसून तिकीट मिळविण्यासाठी मैदानात उतरले आहेत.५ जुलैपर्यंत उमेदवारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

अकोला: अकोला जिल्ह्यात भाजापाने निर्माण केलेल्या झंझावातापुढे गलितगात्र झालेल्या काँग्रेसला उभारी मिळण्याची एकही संधी मिळत नाही. लोकसभेसह विधानसभेत सातत्याने काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अपेक्षित यश मिळण्याऐवजी आलेल्या अपयशानंतरही काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उत्साह दिसून येत आहे. तिकीट मिळविण्यासाठी जुन्यांसह नवखेही मैदानात उतरले आहेत. पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी सुमारे ४१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले असल्याची माहिती आहे.

प्रदेश काँग्रेस कमिटीने विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना देवडिया काँग्रेस भवनातून ५ जुलैपर्यंत उमेदवारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. संबंधित अर्ज आवश्यक दस्तावेज व १५ हजार रुपये शुल्कासह प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुंबई येथील कार्यालयात जमा करायचे आहेत. जिल्ह्यात काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असताना विधानसभा निवडणुकीसाठी फारसे कुणी इच्छुक असणार नाहीत, अशी शक्यता वाटत होती; मात्र जय-पराजयाची पर्वा न करता काँग्रेसमधील इच्छुक कंबर कसून तिकीट मिळविण्यासाठी मैदानात उतरले आहेत. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची गर्दी आहे....

फोटो - http://v.duta.us/oGgqagAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5HinwQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬