पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद

  |   Akolanews

अकोला: पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी अधिवेशनानंतर आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 202 तक्रारी प्राप्त झाल्या. या सभेच्या माध्यमातून तक्रारदारांना दिलासा मिळाला असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्वत: लोकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसाच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही त्यांना दिला.

जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे , प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/bL6aigAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wbgNJAAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬